स्फुट
स्फुट
चित्र: मनीषा शिंदे कंडलूर
लहानपणीच वाटलं आपण जरा लिहावं. पण म्हणजे काय करावं? काही वेळा काही गोष्टी सतत झिरपतच असतात तसंच काहीसं वाटलं. पण मग काहीसं वाटत असतानाच हायसं वाटलं. समोर मास्तर दिसले मराठीचे. तसा त्यांचा विषय इंग्लिश. मग मराठीचे का? काहीही बोलायचं! पण तसं नाही, इंग्लिश पण ते मराठीतच शिकवायचे! तात्पर्य काय, की मास्तर आज उपयोगाला येणार होते. मास्तरांना म्हटलं “कसं चालूय?”ते म्हणाले, “बोल गड्या. तू आज चाल करुन आलायस, आत्तापर्यंत ठीक चालू होतं.”
“तसं नाही मास्तर, मला लिहायचंय.”
“काय? काय लिहायचं म्हणतोस? वाण्याची यादी लिही.”
“मास्तर, फोडणी नका देऊ मला. तडतड उडायला लागलोय. मदत करा की.”
“बरं, श्रीगणेशाय नमः लिही बघू.”
“मास्तर, परीक्षा घेताय?”
“तुला काय वाटतं?”
“जाऊ द्या. लिहूनच टाकतो, हे घ्या.”
“अरर्र, आत्ताच गेला रे तो.”
“कोण मास्तर? अरे, किडे मारायला बोलावला होता आज.”
“मग, पैसे द्यायचे राहिले की काय त्याचे? मी देऊन येतो. मग तर सांगाल कराल ना लिहायचं कसं?”
“अरे दत्त्या, ह्या पेपरावर जे किडे उतरवलेत ना तू! काय अक्षर आहे की आळ्या? अंगातूनच आल्यात जणू! लेखन म्हणजे काही येरागबाळ्याचं काम नाही गड्या.”
“येरागबाळ्याचं काम नव्हे” – मास्तरांकडून जणू मूलमंत्रच मिळाला. तेव्हापासून सगळ्या टापटिपीतल्या गड्यांत लेखक शोधतोय. आणि मी? कधी व्यवस्थित भांग पाडणार, कधी नीटनेटकं दिसणार आणि कधी टंक झिरपणार देव जाणे. मास्तर, धरतोच बघा लेखणी हातात लवकरच.
सकाळचे ५ः५०, टूंऽऽ असा कठोर ध्वनी बंद होतो आणि ऐकू येतं वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयजशीतलाम् … मंगललयीत त्याची सांगता होते आणि ऐकू येतात मृदू शब्द - शके … महिना … पक्ष … तिथी … वार … सौरदिनाङ्क …
पृथ्वीच्या ह्या दिवसाच्या वर्णनानंतर वाद्यांचे मंगलध्वनी कानी पडतात. गीर्वाणवाणीतले धीरगंभीर अमृतप्राशन होईपर्यंत आपल्या चित्तवृत्ती जागृत झालेल्या असतात.
वर्षानुवर्षे अव्याहतपणे ही दिनचर्या घेऊन आपल्या दारी संस्कृतीचे ताट सजलेले असते. आपण करंटे नजर वर घेऊन मिरवत असल्याने ते आपल्या दृष्टीपथाच येतंच असं नाही.
मात्र मा फलेषु कदाचन् हे अंगी बाणवत आकाशवाणी अविरत कार्यरत असते.
लहानपणी, आरक्षण ही पैसे देऊन मिळविण्याची गोष्ट असे. त्यावेळी प्रवासासाठीच आरक्षणाची तरतूद होती असे वाटायचे. शाळेमध्ये काही मित्रांना शुल्क माफ असे. त्यात उल्लेख होताना, प्रामुख्याने स्वातंत्र्यसैनिक, शालेय शिक्षक अशा सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठित गोष्टींचा उल्लेख होई. त्याचबरोबर कमी उत्पन्न गटाचाही समावेश असे. ह्यामुळे ज्यांना शुल्क माफ त्यांच्याबद्दल आदर वा शाळेबद्दल आदर निर्माण होत असे. अनुसूचित जाती जमातींबद्दल विशेष चर्चा नसे. एकमेकांशी खेळताना कधी जात विचारल्याचे आठवत नाही. आजही, चाळीस वर्षात शाळा, महाविद्यालये, प्रवास, नोकरी, सहली ह्यापैकी कुठेही आणि कुणालाही जात विचारल्याचे आठवत नाही.
मुळात हा ब्रह्मराक्षस आहे तरी काय आणि तो निर्माण कसा झाला? जातींबद्दल कुठलीही चर्चा सुरु झाली की मनुला यथेच्छ शिव्या घालण्याची एक मोठी परंपरा आहे. हा तोच मनु ज्याच्यावरून आपण man, मनुष्य, मनुज किंवा माणूस म्हणून ओळखले जातो. असे काय महत्पाप केले मनुने?
प्रत्येक पशूंच्या आचारांमध्ये काही सुसूत्रता असते. हरणे, हत्ती कळपात असतात. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र ठरलेले असते. छोट्यात छोटे कीटक, वाळवी आणि मधमाशा ह्यांचेशी आयुष्य नियोजनपूर्वक रचलेले असते.
मनुने देखील हेच नियोजन अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतरच्या पिढ्यानी त्याचा विपर्यास केला.
व्यवसायाधारित नियोजनात चार गोष्टी (चातुर्वर्ण) मांडल्या होत्या.
विद्यार्जन आणि विद्यादान
संरक्षण
उत्पादन व व्यापार
अन्य समाजोपयोगी सेवा
प्रत्येक स्तंभाला नाव दिले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ह्यातील एक स्तंभ जरी निखळला वा कमकुवत झाला तरी पूर्ण डोलारा कोसळणार. असे असताना काही कोत्या मनाच्या लोकांनी ठरवून टाकले की शूद्र हे हीन दर्जाचे. नाही म्हणायला शूद्रान्ची स्थापना ही पायापाशी केली होती. परंतु पाय किंवा पाया ह्याचे महत्व आणि त्याशिवाय कुठल्याही प्राण्याला अस्तित्व नसणे है सोयीस्कररीत्या बाजूला ठेवले गेले. कालपरत्वे ह्या प्रत्येक स्तंभावर निरनिराळे आघात झाले. आज ह्या डोलाऱ्याचा झालेला खुळखुळा आपण अनुभवत आहोत.
क्षत्रिय रामाचे शिक्षण ब्राह्मण जन्माने वसिष्ठ व कर्माने ब्राह्मण विश्वामित्र ह्यांद्वारे झाले. क्षत्रियांच्या दरबारात ब्राह्मण सल्लागार असत. त्यांना विशेष मान्यता असे. तिजोरीवर वैश्याचे अधिराज्य असे. अन्य गोष्टी पूर्णतः शुद्रांवर अवलंबून असत. रामराज्यात शूद्र रजकाच्या बोलण्यालाही मान्यता होती (भले ते बोल योग्य की अयोग्य हा भाग निराळा).
ब्राह्मण्य अतिशय कष्टप्रद आहे. आज जे ब्राह्मण असल्याचा दावा करतात ते नोकारदार मनुच्या व्याख्येप्रमाणे ‘शूद्र’ आहेत. हे वाक्य सर्व नोकरदार वर्गाला लागू होते. ब्राह्मणाने फक्त विद्यार्जन (संशोधन) व विद्यादानात रत असावे असा नियम आहे. ब्राह्मणाला विद्यादानाबद्दल मोबदला मागण्याचा अधिकार नाही. त्याला शेत पिकविण्याचा अधिकार आहे; परंतु तो शेतमाल कुठलाही मोबदला मागून विकू शकत नाही. याचाच अर्थ जर समाजाने कृपा केली तरच ब्राह्मणाचा चरितार्थ चालेल. म्हणूनच त्याचे अर्थार्जन ‘दान’ मुळे चालते. याचसाठी भिक्षेचा (भीक) अधिकार ब्राह्मणाला आहे. परंतु तोदेखील नियंत्रित. फक्त तीन घरेच भिक्षा मागून जो शिधा (न शिजवलेले अन्न) येईल. त्याचे तीन भाग करून एक भाग तो भक्षण करू शकतो. एक भाग त्याने गुरूला म्हणजेच अजून एका ब्राह्मणाला द्यावा व एक भाग देवाला म्हणजेच अज्ञाताला द्यावा. तीन घरी भिक्षा मिळाली नाही तर काही खाऊ नये. नाहीतर भिक्षा मागण्यात वेळ जाऊन संशोधनास वेळ उरत नाही. ह्यामुळेच ब्राह्मणाच्या उदरनिर्वाहाची जबादारी समाजावर होती.
ब्राह्मण म्हणजे कर्मकांड नव्हे. द्रोणाचार्य जसे युद्धशास्त्रप्रवीण, जसे चाणक्य राज्यशास्त्रनिष्णात, तसेच पराशर हे शेतीशास्त्रद्न्य. आज प्रत्येकाने आपण ब्राह्मण आहोत का हे तपासून पाहावे लागेल.
तेच लागू होते क्षत्रियांना. सर्वांच्या डोक्यावरचे (केवळ स्वतःच्याच नव्हे) छात्र सांभाळण्याची जबाबदारी क्षत्रियावर आहे. रामाने विश्वामित्रांची जबादारी घेतली. दशरथाने चुकून का होईना पण बळी घेतला आणि त्याची शिक्षा भोगली. रामाने शबरीला, रजकाला सांभाळले. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना संरक्षण दिले. अगणित उदाहरणे आहेत. तात्पर्य काय तर समाजाची ही अंगे एकमेकांना पूरक आहेत.
आजच्या सामाजिक स्थितीमध्ये सर्व राजकारणी हे क्षत्रिय आहेत. त्याचबरोबर आपले जवान हे तर त्यातले शिरोमणी. सर्व IAS व सचिव वर्ग हा ब्राह्मण आहे. सर्व शिक्षक वर्ग, संशोधक वर्ग हा ब्राह्मण आहे. सगळे व्यापारी, कमान्यांचे मालक, दुकानदार हे वैश्य आहेत. आमच्यासारखे सेवकवर्ग हे शूद्र आहेत.
चाणक्याने म्हटल्याप्रमाणे, राजसत्ता व त्याचा मद ह्यामुळे क्षत्रिय (आपण सैन्य बाजूला ठेवू व क्षत्रिय हा शब्द राजकारणी ह्या अर्थाने वापरू) अंध होत जातात. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे धृतराष्ट्र – राष्ट्र धरून ठेवलेला. असे अंध धृतराष्ट्र जुलूम करताच वाढतात व जुलूम वाढवतात. अशा वेळी जो कचरा निर्माण होतो तो ठराविक अंतराने साफ करावाच लागतो.
ह्याच विचाराला अनुसरून परशुरामाची निर्मिती होते. परशु धारण केलेला बुद्धीजीवी, म्हणजेच ब्राह्मण. ह्याला अनुसरून चाणक्याची अशी धारणा होती की राज्य, सत्ता ह्याचा मद अंगात भिनतो आणि मग लालसेच्या पायी, मग ती अधिकाराची असो वा पैशाची; हे राजे अंध होऊन जुलूम करू लागतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची गरज असते. चाणक्याचे हे मत आणि परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केल्याचे उल्लेख हे एकमेकांशी निगडीत आहेत. परशुरामाने कोणतीही जात उखडून टाकली नाही. त्याने वृत्तीला आव्हान देऊन ती संपवली.
शिवाजी महाराजांच्या दरबारातही अनेक विद्वान होते.
वैश्य हा व्यापारी वर्ग. किंबहुना, जे व्यापार करतात, ते वैश्य. जशी विद्यार्जन, विद्यादान, संशोधन करणारी मंडळीने ब्राह्मण, जसे संरक्षण करून सुव्यवस्था प्रस्थापित करणारे क्षत्रिय, तसेच, व्यापार करून सगळ्यांचा सांभाळ करणारे वैश्य. आजही, अनेक व्यापारी, मारवाडी, गुजराती लोक भरपूर दानधर्म करताना दिसतात. ह्याचा उगम कुठे असावा? वेदात? धर्मात? नाही. ह्याचा उगम आहे समाजव्यवस्थेत वा रचनेत. ज्याने त्याने आपापल्या कार्यावर निष्ठा राखावी ह्या हेतूने असे सांगितले होते की फक्त व्यापाऱ्यानेच व्यवसाय करावा. म्हणजेच हे व्यापारी. अतिरिक्त मालमत्ता संरक्षणासाठी (क्षत्रिय-राज्यकर्ते) वापरावी. तसेच विद्या क्षेत्रासाठीही वापरावी. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांसाठी पूरक आहेत.
शूद्र म्हणजे नोकरदार. वरील कुठल्याही प्रकारात न मोडणारे शूद्र. शूद्र म्हणजे हीन का? नाही. प्रत्येक नोकरदार हा शूद्रच आहे.शूद्र हां समाजपुरुषाचा म्हणजेच समाजव्यवस्थेचा पाय (पाया) आहे. पायांशिवाय समाज उभा राहू शकत नाही वा चालूही शकत नाही. शूद्राकडे हीनतेने पहाणे ही घोड़चूक, किंबहुना अक्षम्य अपराध आहे. चरणांना नेहमी पूजले जाते. राज्य सुव्यवस्थेसाठी, व्यापारासाठी, लिखापढीसाठी जे नोकर असतात ते शूद्र. त्यांच्या अभावी पूर्ण समाजव्यवस्था कोलमडेल.
व्यापारी, राज्यकर्ते, विद्याव्यासंगी हे संख्येने कमी आणि नोकरदार हे संख्येने जास्त. एकमेकांशिवाय समाजव्यवस्थेचा डोलारा सांभाळू शकणार नाही. म्हणून हे खांब सांभाळणे गरजेचे आहे.
एकाच कुटुंबात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र असणे हेही शक्य आहे. आजच्या काळात आमटे, दाभोलकर हे खरे ब्राह्मण.
एवढी सुंदर समाजरचना असताना आपण त्याचा विपर्यास केला. ह्या समाजरचनेला आपण जन्मावर आधारित करू लागलो आणि ‘जात’ म्हणू लागलो. जात ह्या शब्दातच हे वर्गीकरण जन्मसिध्द असते असे जाहीर होते. ते पूर्णत: चुकीचे आहे. विश्वामित्र आणि वसिष्ठ ह्यांचा वाद ह्याचसाठी (कर्माधिष्ठित वा जन्माधिष्ठित समाजरचना) होता. क्षत्रियाचा सिद्धार्थ हा ब्राह्मण बुद्ध झाला. शूद्र वाल्याचा ब्राह्मण वाल्मिकी झाला. हे आपण सोयीस्करपणे विसरलो. ह्यामध्ये जन्माधारित काहीच नव्हते. परंतु आपण एवढा विपर्यास केला की आज आपल्या शरीराची (समाजव्यवस्थेची) अंगे एकमेकांवर कुरघोड़ी करू पहाताहेत.
लोभीपणा हा माणसाचा स्थायीभाव. पुढे जाऊन राज्यकर्त्यांनी जमिनीचा व व्यापाऱ्यांनी पैशाचा हव्यास केला. विद्याविभूषितांनी अर्थार्जनासाठी (त्यांनी अर्थार्जन करू नये असा दंडक होता) अनेक क्लृप्त्या शोधून काढल्या. त्यातूनच ब्राह्मणाला गोदान, भूदान, अशा मागण्या चालू झाल्या आणि मग त्यांचे स्तोम माजवले गेले. गरजेतून, लोभीपणाकडे आणि नैसर्गिकतेकडून अनैसर्गिकतेकडे (पैसे) जाताना विषय मूळ संकल्पनेपासून भरकटले. ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे आपली आखीव रेखीव समाजरचना हे अनावश्यक तृण माजवण्याची जागा झाली. नोकरदार म्हणजेच शूद्र वर्ग ह्या विवादात किंवा रस्सीखेच मध्ये कुठेच सहभागी नसल्याने कायमच निराळा पडला.
पूर्वीचे राजे ब्राह्मणांना जमिनी देत असत. वैश्य (व्यापारी) दक्षिणा देत असत. नंतर हेच ‘देणे’ जाऊन ‘मागणे’ आले. त्यानंतर ‘धमकावणे’ आले. पाठोपाठ ‘दाम्भिक’ पणा आला. ह्या गोष्टी धार्मिक ग्रंथात घुसवल्या गेल्या. ह्याचा उगम माणसाच्या वृत्तीत आहे. हव्यासात आहे.
आजही राजकारणांचा (क्षत्रिय) पिढीजात धंदा म्हणजे राजकारण. व्यापाऱ्यामध्येही तेच. आम्ही नोकरदार (शूद्र) देखील तेच करतो. कर्माने ब्राह्मण असलेली जमात नामशेष होऊ घातली आहे. जेव्हा उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नसताना, समाजातील उपेक्षित मुलांच्या शिक्षणाचा कंदील पेटवणारे पुण्यातले जोडपे भेटते तेव्हा अशा ब्राह्मणाला (कर्माने) दक्षिणा द्यायला हात पुढे सरसावतात. हेमलकशातील ब्राह्मणाला (कर्माने) देशविदेशातून दक्षिणा येतात.
एवढे सगळे चर्वीचरण करण्याचे कारण एकच. आपले आधारस्तंभ मोडू नयेत. ते एकमेकात आपटून फुटू नयेत. शूद्र नोकरदार कुणाच्या अध्यातमध्यात नसतो. बाकीचेच तीन खांब ज्वलनशील आहेत. त्यांना घासण्यापासून थांबवूयात.
When they came into power, for the first time, I felt that it was ‘our’ government. They came in power and started ruling. Somehow, I felt that the strategy would be bottom up. Principles of Gandhiji like self-dependent villages were seemed to have been adopted. There were never before speeches by the out of the world orators.
The figures which are shown are really impressive and show tremendous improvements in the economy.
Is it really true growth? It may be. If the claims are true, it means, infrastructure is getting developed. Money is getting pumped into the infrastructural developments. Foreign investments are being mobilized. All this is a really a picturesque landscape. Sky is looking awesome and bright. We are getting taller. Sky is not too far.
I can see the sky getting gloomier too. Even though we are getting taller and sky is becoming brighter, the stars are disappearing. Odd even-odd techniques are tried in the air. The soil is getting darker and harder. Green is getting skinny.
Sometimes I wonder if we are out of thoughts or negligent.
Can land acquisition work well?
We learned a lot about planned city Chandigarh. Is it not possible to go that way?
A land of 200 acres can be divided into
high rise buildings for residential complexes, manufacturing industries, schools, junior colleges, sports facilities, offices, medical facilities
What is new in the above? Such townships are already in place and showcasing their state-of-the-art creations. Probably the missing things are ownership of the townships.
If the industries own 40% of the residential flats and offer them to their employees, it could have less burden on roads. 200 acres is easily reachable using bicycle or buses internal to township. Kirloskarwadi can still be built.
Other missing parts could be growing vegetables within the township. Farmers could be offered land on lease or free of cost. They should be allowed to grow and sell the vegetables to the residents and then to the employers of the industries.
REPORT THIS AD
Is that all? Certain open areas could be covered with sheds having photovoltaic cells on top. This is also possible on top of every building roof top solar panels must be installed. Why not offer covered parking to all with solar roofs?
All local trees must be planted on the periphery of the township and along boundaries of each area, e.g., between residential and industrial, industrial and school, etc.
This is also not enough. All roads must be one-way. All the zones must be connected with circular roads. None of the roads must be broader than 20 ft. All roads must have 3 feet wide footpath on either side. All roads must have 2 feet wide cycling track on both the sides.
Every building must have water collector for collecting and channelizing rain water and water overflow.
Other things like water conservation, waste management, etc. must be in place.
Who will administer all this? The responsibility of this could be with the industries within the township and they could be penalised heavily in case on non-compliance.
These are some random thoughts. People might be working on these already but the irony is that the results are not visible yet. If this is implemented correctly, we can see blue sky and the stars again.